दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू करण्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Tuesday, December 11, 2018
मुंबई : दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच, ज्या महसूली मंडलात ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी आहे, त्या मंडलांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.



राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झाली. या बैठकीला पदुम मंत्री महादेव जानकर, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव मेधा गाडगीळ, सहकार विभागाच्या सचिव आभा सिंह, कौशल्य विकास विभागाचे सचिव आसिम गुप्ता यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment