मोदी सरकारची उलटी गिनती सुरू – राज ठाकरे

Tuesday, December 11, 2018

मोदी सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा खूप काही सांगून जातो, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.


आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे अर्थविश्वात खळबळ उडाली आहेच. शिवाय त्यांच्या या राजीनाम्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरूनच राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्गही मोकळा झाला.

यावरूनही राज यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. मल्ल्या भारतात असताना पैसे देण्यास तयार होता. मग त्याच्यावर पळून जाण्याची वेळ का आली? नीरव मोदीबाबत केंद्र सरकारची मीठाची गुळणी का? असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले आहेत.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment