Tuesday, December 11, 2018December 11, 2018
सांगली : सांगलीतील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात शिकणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात सांगली पोलिसांनी एका प्राध्यापकाला अटक केली आहे. ऋषिकेश कुडाळकर असे या संशयित प्राध्यापकाचे नाव असून खुनाच्या घटनेनंतर तो फरार झाला होता.
सांगलीच्या शांतिनिकेतन येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधील विद्यार्थिनी वैशाली नलवडे - मुळीक हिची रविवारी निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. विद्यापीठाच्या इमारतीमधील एका वर्गात वैशालीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यामुळे शांतिनिकेतन परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी काल संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला आत्महत्या की घातपात याबाबत पोलिसांच्या समोर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शवविच्छेदन केल्यानंतर वैद्यकीय अहवालामध्ये वैशालीचा गळा दाबून तसेच भिंतीवर डोके आपटल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
वैशाली एका तरुणासोबत त्या अभ्यास केंद्राच्या इमारतीमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटजेमधून समोर आले. त्यावरून त्या तरुणाने खून केल्याचा संशय निर्माण झाला होता. घटनेनंतर तो तरुण फरार होता. याबाबत तपास करुण ओळख पटवली असता, तो तरुण प्राध्यापक ऋषिकेश कुडाळकर असल्याचे समोर आले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
सांगलीतील विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात प्राध्यापकाला अटक

By Marathwada Neta
Tuesday, December 11, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment