Friday, December 28, 2018December 28, 2018
बीड : शहरातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर वर्षभर अत्याचार करणारा आरोपी विजय बाबासाहेब आरगडे याला बुधवारी (२६ डिसेंबर) अटक करून गुरुवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ३० जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी संबंधित मुलगी घरातून बाहेर पडली ती परतलीच नाही. तिचा शोधाशोध घेऊनही ती सापडली नाही. दरम्यान, मुलीचा नेहमीच पाठलाग करणारा व छेड काढणारा आरोपी विजय बाबासाहेब आरगडे (२६, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) हासुद्धा घरी नसल्याचे समजले. त्यामुळे त्याच दिवशी मुकुंâदवाडी पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरण बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आले होते, तर मुलीच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉरप्स रिट याचिका दाखल केली होती. १७ डिसेंबर २०१८ रोजी संबंधित मुलगी तिच्या एक वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन मुकुंâदवाडी पोलिस ठाण्यात हजर झाली आणि 'माझे लग्न आई-वडील व मामाने विजय सोबत लावून दिले' असा जबाब पोलिसांना दिला. हा जबाब खोटा असून, मुलीने तो दबावाखाली दिला, असे तिच्या वडिलांनी दिलेल्या अर्जात म्हटले होते.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

By Marathwada Neta
Friday, December 28, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment