Friday, December 28, 2018December 28, 2018
मुंबई : चेंबूर येथील टिळकनगरमध्ये सरगम सोसायटीत भीषण आग अखेर आटोक्यात आली आहे. मात्र, या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.तर 2 जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे.
टिळकनगर येथील सरगम सोसायटीमधील 35 क्रमांकाच्या इमारतीमध्ये 14 व्या मजल्यावर संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या पोहोचल्या आणि 2 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 4 वृद्धांचा मृत्यू झाला आहे. सुनीता जोशी (वय 72), भालचंद्र जोशी (72), सुमती जोशी (83), सरळ गांगर (52) आणि लक्ष्मीबेन गांगर (83) अशी मृतांची नावं आहे. यापैकी तिघांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका रवाना झाली होती, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर श्रीनिवास जोशी (86) आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी छगन सिंग(28) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
चेंबूर इमारत आग दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू

By Marathwada Neta
Friday, December 28, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment