....तर मानहानीचा दावा दाखल करू- देवेंद्र फडणवीस

Friday, December 28, 2018


मुंबई: मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांमुळे निवडक बिल्डरांना १ लाख कोटी रूपयांहून अधिकचा लाभ झाला असून, या घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाने १० हजार कोटींची ‘डिल’ केली आहे. 

त्यातील ५ हजार कोटींचा पहिला हप्ता पोच देखील झाल्याचा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर विखे-पाटील यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांनी आरोप सिद्ध करावेत, अथवा बिनशर्त माफी मागावी. अन्यथा मानहानीचा दावा दाखल करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment