Friday, December 28, 2018December 28, 2018
मुंबई: देशातील सर्व विमानतळांवर सर्वात आधी स्थानिक भाषेमध्ये उद्घोषणा करण्याचे आदेश सरकारने विमानतळ व्यवस्थापकांना दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईसहीत राज्यामधील सर्वच महत्त्वाच्या विमानतळांवर आधी मराठीमध्ये प्रवाशांना सुचना देण्यात येतील. यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी आदेश दिला आहे. यापुढे प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेमध्ये उद्घोषणा होईल त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये सूचना देण्यात येतील.
यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एएआयच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विमानतळांवर आधी स्थानिक भाषेमध्ये प्रवाशांना सुचना देण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरु होईल. विमानतळाबरोबरच खासगी विमान कंपन्यांनाही स्थानिक भाषांना प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश सरकारमार्फत देण्यात आले आहेत. एएआयच्या अंतर्गत येणाऱ्या देशातील शंभर विमानतळांवर आता स्थानिक भाषांमध्ये प्रवाशांना सुचना देण्यात येणार असल्याने अनेकांना ते फायद्याचे ठरणार आहे.
राज्यामधील सर्वच विमानतळांवर सर्वात आधी मराठीतून होणार उद्घोषणा
By Marathwada Neta
Friday, December 28, 2018
मुंबई: देशातील सर्व विमानतळांवर सर्वात आधी स्थानिक भाषेमध्ये उद्घोषणा करण्याचे आदेश सरकारने विमानतळ व्यवस्थापकांना दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईसहीत राज्यामधील सर्वच महत्त्वाच्या विमानतळांवर आधी मराठीमध्ये प्रवाशांना सुचना देण्यात येतील. यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी आदेश दिला आहे. यापुढे प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेमध्ये उद्घोषणा होईल त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये सूचना देण्यात येतील.
यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एएआयच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विमानतळांवर आधी स्थानिक भाषेमध्ये प्रवाशांना सुचना देण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरु होईल. विमानतळाबरोबरच खासगी विमान कंपन्यांनाही स्थानिक भाषांना प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश सरकारमार्फत देण्यात आले आहेत. एएआयच्या अंतर्गत येणाऱ्या देशातील शंभर विमानतळांवर आता स्थानिक भाषांमध्ये प्रवाशांना सुचना देण्यात येणार असल्याने अनेकांना ते फायद्याचे ठरणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment