मोदींच्या विदेश वाऱ्या बंद !

Thursday, December 27, 2018


नवी दिल्ली: वारंवार विदेश यात्रा केल्याबद्दल टीकेचे धनी बनलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता विदेश यात्रा बंद करण्याचे योजले आहे. त्यांनी आता केवळ निवडणुकीवरच लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. पुढील काही महिने त्यांच्या विदेश यात्रांचे कोणतेही नियोजन नसल्याचे पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे
.

मोदींनी आत्ता पर्यंत एकूण 48 दौरे करून 83 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या या दौऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी निधीची उधळपट्टीही झाल्याचा आरोप होत आहे. आगामी काळात कोणतेही मोठे आंतरराष्ट्रीय इव्हेंट किंवा परिषदा नाहींत. त्यामुळे पंतप्रधानांना देशाबाहेर जाण्याची आता काही काळ तरी गरज नाही असे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी चालू वर्षात एकूण चौदा विदेश यात्रा केल्या. त्यांनी शेवटचा दौरा अर्जेन्टीना येथे केले होता. तेथे जी 20 परिषदेसाठी ते उपस्थित राहिले होते. वाराणसीत 21 ते 23 जानेवारी दरम्यान प्रवासी भारतीय दिवसाचा कार्यक्रम होणार असून त्याला मात्र पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत

No comments:

Post a Comment