हसण्याने आयुष्य वाढतं' असं म्हटलं जातं. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की हसण्याबरोबरच रडणंही आरोग्यासाठी तितकंच लाभदायक असतं. तुमच्या वेदना अश्रूंच्यामार्फत बाहेर पडतात. त्यामुळे मनावरील ताण दूर होतो. एवढंच नव्हे, तर रडण्यामुळे तुमचं शरीरही फिट राहातं.

जेव्हा डोळ्यातून अश्रू बाहेर येतात, काही वेळाने आपल्या नाकातून देखील पाणी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे नाकातील घाण साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर नाकातील बॅक्टेरिया बाहेर पडतो.
एका संशोधनाच्या मते रडल्यानंतर हलकं वाटतं, कारण तणावादरम्यान तयार होणारे केमिकल्स अश्रूंवाटे बाहेर निघून जातात. यामुळे रडल्यानंतर हलकेपणा जाणवतो.
कांदा चिरताना कांद्यातील रसायन डोळ्यात जातं आणि डोळ्यांतून पाणी बाहेर येतं. मात्र त्यामुळे डोळ्यांतली घाण साफ होते.
रडण्यामुळे हृदयाला आणि मेंदूलाही लाभ होतो.
रडण्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होतो त्यामुळे तुमच्या अश्रूंना अडवू ठेवू नका. या पुढे अश्रू अनावर झाले तर आपली भावना मनात दाबून ठेवू नका. कारण कधीकधी असं केल्यामुळे नुकसानच अधिक होतं.
No comments:
Post a Comment