राज्यभरात दुष्काळाचे सावट गडद

Thursday, December 27, 2018


पुणे – राज्यावरील दुष्काळाचे सावट आणखी गडद होण्यास सुरूवात झाली असून रब्बी हंगामावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत फक्‍त 46 टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण 66 टक्के झाले होते.

रब्बी हंगामात सर्वात महत्वाचे पीक असते, ते ज्वारीचे. पण, यंदा ज्वारीचे प्रमाण घटले असल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत फक्‍त 38 टक्‍के क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी 63 टक्‍क्‍यांपर्यत पेरण्या झाल्या होत्या. त्याचबरोबर गव्हाच्या पेरणी प्रमाणसुद्धा फक्त 34 टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत फक्त 3 लाख 47 हजार 581 क्षेत्रावर गहू पेरला गेला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण पाच लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर गेले होते.

या पारंपारिक पिकांपेक्षा रब्बीतील कडधान्ये पिकांकडे यंदा शेतकऱ्यांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे.हरभऱ्यांची पेरणी जास्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 71 टक्के क्षेत्रावर म्हणजेच 10 लाख 64 हजार 580 क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्याचबरोबर इतर कडधान्यांच्यासुध्दा 83 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment