Monday, December 17, 2018December 17, 2018
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री आज एकाच दिवशी शपथग्रहण करणार आहेत. या तीनही राज्यात काँग्रेसने बाजी मारत संबंधित राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ, राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल शपथ ग्रहण करणार आहेत. त्या त्या राज्यातील राज्यपाल या तिघांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोत सकाळी १० वाजता शपथ घेतील. तर उपमुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट शपथ घेणार आहेत. जयपूर येथील ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी गहलोत हे तिसऱ्यांदा विराजमान होणार आहेत.
मध्य प्रदेशचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून दुपारी दीड वाजता कमलनाथ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल कमलनाथ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
'ते' तीन मुख्यमंत्री आज घेणार शपथ

By Marathwada Neta
Monday, December 17, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment