शरद पवार ‘संविधान भीम गौरव' पुरस्काराने सन्मानित

Monday, December 17, 2018


नागपूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रकाश गजभिये यांनी 'संविधान भीम गौरव पुरस्कार' स्मृतिचिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

शरद पवार यांनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध प्रभावीपणे संघर्ष करून मागासवर्गीय, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा न्याय्यहक्क मिळावा, यासाठी धोरणे आखून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीचे काम समर्थपणे पार पाडले आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 'युवा धोरण' जाहीर करून त्यांना सर्व क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्याचा वेध घेऊन त्यानुसार अविरत वाटचाल करणारा 'राष्ट्रवादी' पक्ष उभा केला.

No comments:

Post a Comment