पत्नीच्या छळामुळे पतीची आत्महत्या

Monday, December 17, 2018

पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरातील रहिवासी पंकज चंद्रकांत अंभोरे (३४) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंकजची पत्नी मनीषा (३२) आणि तिचा प्रियकर अरुण मिश्रा यांच्यामुळे पंकजने आत्महत्या केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.
पंकज प्रेमात अडसर ठरत असल्याने मनीषा आणि अरुण यांनी त्याची दगडाने ठेचून खून केल्याची चर्चा होती. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला होता. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

No comments:

Post a Comment