पणजी: केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या अनुषंगाने सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते गोवा विद्यीपाठाच्या 31 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल मृदूला सिन्हा, कुलगुरु वरुण साहनी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रकाश जावडेकर यांनी आणखी एक घोषणा केली की, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकींग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) अंतर्गत लहान विद्यापीठांचेही मुल्यांकन केले जाईल. सरकार शिक्षणपद्धती अद्ययावत करण्यासाठी नवनवे उपक्रम राबवत आहे. गुणवत्ता, संशोधन आणि नवकल्पना या तीन मुलभूत घटकांवर आधारीत शिक्षणपद्धतीवर सरकारचा भर आहे, असे जावडेकर म्हणाले.
No comments:
Post a Comment