Monday, December 17, 2018December 17, 2018
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शनिवारी राफेल प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) मार्फत करण्याची विरोधकांची मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. फेसबुक ब्लॉगवरून सरकारची भूमिका मांडताना त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार पलटवार केला.
सर्वोच्च न्यायालयाने आता अंतिम निर्णय दिला आहे. त्यामुळे कॅगच्या मताचा कुठलाच संदर्भ उरत नाही, असे त्यांनी म्हटले. खोटे पसरवण्याचा कॉंग्रेसचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. आता तो पक्ष न्यायालयाच्या निर्णयावरून आणखी असत्य उत्पन्न करत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. सरकारने न्यायालयात वस्तुस्थितीच मांडली, असा ठाम दावाही त्यांनी केला. त्यामुळे राफेल प्रकरणावरून कुठली माघार न घेता विरोधकांशी टक्कर घेण्याचाच सरकारचा पवित्रा असल्याचे स्पष्ट झाले.
राफेलची जेपीसीमार्फत चौकशी नाही

By Marathwada Neta
Monday, December 17, 2018
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शनिवारी राफेल प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) मार्फत करण्याची विरोधकांची मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. फेसबुक ब्लॉगवरून सरकारची भूमिका मांडताना त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार पलटवार केला.
सर्वोच्च न्यायालयाने आता अंतिम निर्णय दिला आहे. त्यामुळे कॅगच्या मताचा कुठलाच संदर्भ उरत नाही, असे त्यांनी म्हटले. खोटे पसरवण्याचा कॉंग्रेसचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. आता तो पक्ष न्यायालयाच्या निर्णयावरून आणखी असत्य उत्पन्न करत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. सरकारने न्यायालयात वस्तुस्थितीच मांडली, असा ठाम दावाही त्यांनी केला. त्यामुळे राफेल प्रकरणावरून कुठली माघार न घेता विरोधकांशी टक्कर घेण्याचाच सरकारचा पवित्रा असल्याचे स्पष्ट झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment