कर्जमाफी चा लाभ ९० % शेतकऱ्यांना : दानवे

Wednesday, December 26, 2018


नागपुर: राज्य सरकारने गेल्या वर्षी जी कर्जमाफी योजना जाहीर केली होती त्याचा राज्यातील 90 टक्के शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

 काल पंढरपुर येथील सभेत बोलताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नसल्याचा दावा केला होता त्या पार्श्‍वभूमीवर दानवे यांनी हा दावा केला. राज्य सरकारने जून 2017 मध्ये एकूण 34 हजार कोटी रूपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती.

येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले की सरकारने जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळत असून ही प्रक्रिया अजून सुरू आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दोन रूपये दराने गहु आणि तीन रूपये दराने तांदुळ विकला जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

No comments:

Post a Comment