लातूर जिल्ह्यात भीषण अपघात,पाच जणांचा मृत्यू,दाेन जण जखमी.

Tuesday, December 18, 2018
मित्राच्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी जात असलेल्या मित्रांची भरधाव जीप पुलावरून खाली उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांत डिकसळ (ता. कळंब) येथील तीन तर अन्य ठिकाणच्या दाेघांचा समावेश अाहे. साेमवारी दुपारी १.१० वाजेच्या सुमारास लातूर तालुक्यातील मुरूड अकोला शिवारात हा अपघात झाला, त्यात अन्य दाेघे गंभीर जखमी झाले. 


कळंब तालुक्यातील डिकसळ येथील सूरज परळकर याचे लातूर येथील १२ नंबर पाटीजवळ लग्न होते. सूरज यांचा मोठा भाऊ महेश यांचे मित्र जीपमधून या विवाहासाठी जात होते. यात ज्ञानेश्वर बब्रुवाहन खंदारे ( २५), जगन्नाथ चंद्रकांत पवार (३२), परमेश्वर जोतीराम अंबीरकर ( ३२, तिघे राहणार डिकसळ), जरीचंद हरिभाऊ शिंदे (३५, युसूफ वडगाव, ता. केज),गणेश मनोहर सोमासे ( ३१, खडकी, ता. कळंब), श्रीकांत अंबिरकर (रा. डिकसळ ) व दत्तात्रय जाधव (रा. कळंब) यांचा समावेश होता. 

लग्नाची वेळ दुपारी १२.४० वाजेची होती. ही वेळ गाठण्यासाठी मित्रांची जीप वेगाने चालली हाेती. मुरूड अकोला गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे जीप पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली. यात ज्ञानेश्वर, जगन्नाथ, परमेश्वर, जरीचंद, गणेश यांचा मृत्यू झाला. तर श्रीकांत व दत्तात्रय गंभीर जखमी झाले आहेत. 

No comments:

Post a Comment