नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह दोघींचा विनयभंग

Tuesday, December 18, 2018


नागपूर : नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह दोघींचा शहरात विनयभंगझाल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिली घटना यशोधरानगर परिसरात घडली. पीडित ९ वर्षांची मुलगी आईच्या सांगण्यावरून शेजाऱ्याकडे साडी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी अंदाजे २२ वर्षे वयोगटातील एका तरुणाने सायकलवरून येऊन मुलीला कडेवर घेतले व तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. दुसरी घटना, हुडकेश्वर परिसरातली आहे. येथील फिर्यादी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर एकाने अश्लील संदेश पाठवले व व्हीडिओ कॉल करून विनयभंग केला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

No comments:

Post a Comment