लोहा शहराच्या विकासासाठी मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांच्याकडून 20 कोटी रू. पेक्षा ही जास्त निधी आणू --आ.प्रतापराव पाटील चिखलीकर

Tuesday, December 18, 2018

लोहा (प्रतिनिधी )
लोहा शहराच्या विकासासाठी मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांच्याकडून 20 कोटी रू. पेक्षा ही जास्त निधी आणू असे प्रतिपादन लोहा -कंधार मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा येथे मुकदम परिवारांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्याच्या भव्य सत्कार कार्यक्रमात केले. 

नुकत्याच झालेल्या लोहा न.पा. च्या सार्वत्रिक निवडणुकीत आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने घवघवीत यश संपादन करीत नगराध्यक्षा सहित 13 नगरसेवक निवडूण आले. या घवघवीत यशाबद्दल भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्‍य माणिकराव मुकदम, नवनिर्वाचित नगरसेवक केशवराव मुकदम, युवानेते सचिन मुकदम परिवारांच्या वतीने भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व भाजपाचे नवनिर्वाचित 13 न. प. सदस्य यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला. 

यावेळी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्याम सुंदर शिंदे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, जि. प. सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, हंसराज पाटील बोरगावकर, चंद्रसेन पाटील, आयोजक भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्‍य माणिकराव मुकदम, साहेबराव पाटील काळे, बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, नवनिर्वाचित नगरसेवक छञपती धुतमल, दता वाले, शरद पवार, नगरसेविका सौ. गोदावरी सूर्यवंशी,राहिबाई खिल्लारे, यांच्यासहीत सर्व भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक, आदी उपस्थित होते. 

यावेळी भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, व सर्व 13 नगरसेवकांचा सत्कार मुकदम परिवारांच्या वतीने आ. प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी सनदी अधिकारी श्याम सुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुढे मार्गदर्शन करताना आ.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, कंधार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली कंधार शहराच्या विकासासाठी मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांनी 20 कोटी रूपयांचा निधी दिला लोहा वासियांनी भाजपाला भरभरून मतदान दिले. लोहा शहराला कंधार पेक्षा ही जास्त निधी आणू व ज्यावेळी लोहा न.पा. निवडणूकीची विजयी सभा झाली त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचे फोनवरून अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोहयाला लवकर आणून कार्यक्रम घेऊत. मुकदम परिवारांने हा घरगुती सोहळा आयोजित केला आमच्यासहित सर्वाचा सत्कार केला शिंदे साहेबांनी उल्लेख केला माणिकराव बोलले. खरच मुकदम साहेबाची पुण्याई आहे. माझ्या वडीला बरोबर त्यांनी काम केले मला ही त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली मी जिल्हा परिषदेला होतो. ते पंचायत समितीला होते. कलंबर कारखान्यालाही आम्ही सोबत काम केले. आज ही लोक सांगतात मुकदम साहेबांनी अनेक विकास कामे केलीत. बोअर पाडलेत , रस्ते केलेत मुकदम साहेबाची पुण्याई आहे. मुकदम व सुर्यवंशी घराण्याला इतिहास आहे. राजकारणाची पंरपंरा आहे.
मी लोहा वासियांचे आभार मानतो त्यांनी नगराध्यक्षा सहित 13 नगरसेवक निवडूण दिले .18 तारखेला गजानन सुर्यवंशी नगराध्यक्षाचा पदभार घेत आहेत. मला सांगितले लोहा शहरातील रस्त्यातले खड्डे बुजवा रस्त्यावर नालीचे पाणी येत आहे त्यामुळे डांबरी रस्ता खराब होत आहे. तुम्ही दोन्ही बाजूनी जेसीबी लावून नाली करा मी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता करून देण्यास लावतो. आपण येथे बसलेले सगळेजण प्रचारक आहोत आपण निवडणूकीत जे जे  शब्द दिला आहे तो पाळला जाईल विकास कामे करून दिलेले आश्वासन पूर्ण केले जातील. 

लोहा शहराला माॅडेल शहर बनवायचे आहे. छञपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करायचे आहे. नांदेड जिल्ह्यातील माॅडेल बौध्द विहार बनवायचे आहे. मुस्लिम शादीखाना बनवायचा आहे अनेक विकास कामे करायचे आहेत .ज्यांनी मतदान दिले त्यांचे आभार ज्यांनी मतदान दिले नाही त्याचे ही आभार नागरिकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता विकास करायचा आहे. दादागिरी, गुंडगिरी मोडून काढायची आहे असे आ. चिखलीकर म्हणाले. 

सचिन मुकदम व दिपक कानवटे मिञमंडळाचे आ. चिखलीकराकडून कौतुक  या लोहा न. पा. च्या निवडणूकीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्करराव पाटील पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव मुकदम यांनी केले व आभार सचिन मुकदम यांनी मानले.

No comments:

Post a Comment