हिंगोली / प्रतिनिधी
रोजंदारी पालिका कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, सातवा वेतन आयोग लागू करावा या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी नगर परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी 15 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन केले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
येथील नगर पालिकेसमोर शनिवारी महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षापासून शासन दरबारी मांडण्यात आल्या. परंतू, या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे नगर परिषद कर्मचारी हैराण झाले आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास दि. 29 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम करणे, 1 जानेवारीपासून नगर परिषद कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात विश्वनाथ घुगे, बाळु बांगर, विश्वनाथ ढोके, राजु शिखरे, मुंजाजी बांगर, शिवाजी घुगे, विजय शिखरे, बाबुराव काळे, विजय इंगोले, कैलास शिंदे, गजानन आठवले, संदिप कांबळे यांच्यासह सफाई कामगार, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment