कळमनुरी / प्रतिनिधी
तालुक्यामधून जाणारा नांदेड-वर्धा या राष्ट्रीय महामार्गाकरिता जमिन संपादीत करण्यासाठी 106 कोटी 91 लाख 12 हजार 286 रूपये प्राप्त झाले असून या महामार्गासाठी संपादीत करण्यात आलेल्या शेतजमीन व इतर मालकी हक्काच्या अदायगी पोटी आतापर्यंत 87 कोटी 75 लाख 98 हजार रूपये मालमत्ता धारकांना वाटप करण्यात आले आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या नांदेड ते वर्धा राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 हा वारंगा फाटा, वरूड, भाटेगाव, डोंगरकडा, चुंचा, फुटाणा, कुर्तडी, वारंगा या गावातून जात आहे. या गावामधील शेतजमीन तसेच नागरी वसाहतीमधील निवासस्था, व्यापारी प्रतिष्ठाणची पक्क्या स्वरूपाची बांधकामे संपादीत करणे गरजेचे आहे. सदरील शेतजमिनी व इतर मालकीच्या जागा संपादीत करण्याचे काम जवळपास अंतिम टप्यामध्ये आले आहे. या महामार्गासाठी 53.7463 हेक्टर शेतजमिन संपादीत करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यापैकी 50.5556 हेक्टर शेतजमीनीचे निवाडे झाले आहेत. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी या कामाला गती दिली आहे. जमीन मालकांना त्यांच्या जमीनीचा मोबदला वाटपाचे काम पुर्णत्वास गेले असून आतापर्यंत 87 कोटी 76 लाख 98 हजार 485 रूपये वाटप करण्यात आले आहेत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी व मालमत्ता धारकांचे आक्षेप निकाली काढून रक्कम वाटपाचे काम हाती घेण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment