हिंगोली / प्रतिनिधी
येथील शिवाजी महाविद्यालयात कै. एकनाथराव पवार स्मृती पित्यर्थ शनिवारी आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन 29 डिसेंबर शनिवारी करण्यात आले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बाळासाहेब क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समान नागरी कायदा काळाजी गरज आहे किंवा नाही या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयीन गट आणि कनिष्ट महाविद्यालयीन गट असे दोन गट करण्यात आले आहे. वरिष्ट गटात प्रथम पारितोषीक 3 हजार 1 रूपये, स्मृतीचिन्ह, द्वितीय पारितोषीक 2 हजार 1 आणि स्मृतीचिन्ह, वैयक्तिक पारितोषीक 501 रूपये ठेवण्यात आले आहे. कनिष्ट गटात प्रथम पारितोषीक 2 हजार 1 व स्मृतीचिन्ह, द्वितीय पारितोषीक 1 हजार 1 व स्मृतीचिन्ह आणि वैयक्तिक 501 रूपये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक महाविद्यालयातून कनिष्ट व वरिष्ट गटातून संघ पाठविण्याचे आवाहन संयोजक प्राध्यापक डॉ. संगीता मुंडे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment