मंगळवारी कोतवाल संघटनेचे धरणे आंदोलन

Monday, December 17, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने दि. 18 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कोतवाल संघटनेच्या वतीने यापुर्वी काम बंद आंदोलन करण्यात आले होते. कोतवालांना सहाव्या वेतन आयोगानूसार दरमहा वेतन श्रेणीच्या अहवालाला मान्यता दिलेली नाही. संघटनेने आंदोलने, उपोषण केली आहेत. परंतू, शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. कोतवालांना लिपिक संवर्ग व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कामे करावी लागत आहेत. परंतू, आज घडीला कोतवालांना केवळ पाच हजार रूपये मानधनावर काम करावे लागत आहे. महागाईमुळे हे मानधन तोकडे असून कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, सेवानिवृत्त कोतवाला पेन्शन द्यावी, तलाठी व तत्सम पदासाठी एकूण जागेच्या 30 टक्के आरक्षण द्यावे, टपाल व कार्यालयात काम करणाऱ्या कोतवालांना प्रवास भत्ता द्यावा, तहसील कार्यालयात रात्रपाळीचे काम देवू नये आदी मागण्यांचा समावेश असून या आंदोलना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय चांदणे, सचिव संदिप गाभणे, विभागीय अध्यक्ष बाळु नागरे, संदिप मुंडे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment