नितीन गडकरींना स्टेजवर भोवळ आता प्रकृती स्थिर : साईबाबांचे दर्शन घेऊन नागपुरला रवाना

Friday, December 7, 2018

अहमदनगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमातच चक्कर आली . राष्ट्रगीतानंतर खुर्चीवर बसत असतानाच ते कोसळू लागले .राज्यपालांनी त्यांना सावरले . गडकरींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती आता ठीक आहे . शुगर कमी-जास्त झाल्याने त्यांना चक्कर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहमदनगरच्या राहुरी मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात नितीन गडकरी उपस्थित होते . गडकरी यांच्या भाषणानंतर राष्ट्रगीत सुरु असताना त्यांना अचानक चक्कर आली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नितीन गडकरींना सावरलं.

या घटनेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. डॉक्टराचं एक पथक तिथे दाखलं झालं. त्यांनी गडकरींना इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं .

गडकरींच्या नियोजित कार्यक्रमांमधील हा शेवटचा कार्यक्रम होता. त्यानंतर ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाणार होते. चक्कर आल्यानंतरही विशेष विमानातून ते शिर्डीला गेले साईबाबांचे दर्शन घेऊन त्यानंतर नागपूरला रवाना झाले गडकरी यांच्या प्रकृतीची काळजी करण्याची गरज नाही ,असं डॉक्टरांनी सांगितलं .

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment