लोहा नगर पालिका निवडणुकीत मतदारांनी ‘प्रताप’ घडवावा

Friday, December 7, 2018


विशेष संपादकीय. प्रा. रामेश्‍वर बद्दर रेणापूरकर

लोहा नगर परिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर या निवडणुकीत सरळ सरळ दोन पॅनल आहेत. एक भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर तर दुसरा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचा काँग्रेसचे पॅनल. या निवडणुकीत आजची परिस्थिती पाहता केंद्रातील, राज्यातील सरकारचा विचार करता व गेल्या पाच वर्षात लोहा नगर परिषदेत जे नुकसान झाले, वाटोळे झाले, स्पीड ब्रेकर आली त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या पॅनलला लोहा ग्रामस्थांनी विजयी करणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं. 

निश्‍चित अशोकरावजी चव्हाण यांचं नांदेड जिल्ह्यात वर्चस्व असलं तरी बदलत्या परिस्थितीत विचार करत असतांना प्रामुख्याने केंद्राचा निधी, राज्याचा निधी आणण्याची धमक, ताकत, कुवत ही आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात आपल्या कार्यातून, आपल्या जगण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. निश्‍चित जेंव्हा लोहा गावातील लोकांना भेटण्याचा योग होतो तेंव्हा खाजगीत लोक कबूल करतात की, गेल्या नगर पालिका निवडणुकीला चुक झाली आणि प्रतापराव पाटील यांचं पॅनल आम्ही निवडून दिलं नाही. पण ही चूक दुरुस्त करण्याची आज वेळ आलेली आहे व खर्‍या अर्थाने विकासाच्या प्रक्रियेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सावकार व त्यांच्या सोबतच्या 17 लोकांना विजयी करणं गरजेचं आहे. 

असा प्रश्‍न निर्माण होवू शकतो की, कशासाठी प्रताप पाटील चिखलीकर याचं उत्तर मिळतं केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीनजी गडकरी यांनी लोहा येथील सभेत स्पष्टपणे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी ताकत, शक्ती, आशिर्वाद दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंधारच्या सभेत स्पष्टपणे सांगितले की, प्रतापराव पाटील यांच्या कोणत्याही विकास कामाला अजिबात अडसर येणार नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडं दूरदृष्टी आहे, ज्यांच्याकडं नियोजन आहे, ज्यांच वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गुणांमुळे त्यांनी महाराष्ट्रात, मराठवाड्याची शान आणि मान उंचावण्याच काम केलेलं आहे आणि म्हणून विकासाची गंगा आपल्या दारी येत असतांना अफवा, भूलथापा, बुद्धीभेद, प्रलोभने याच्या आहारी न जाता सामूहीक प्रयत्नातून प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वातील पॅनलला मतदान करणं महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. 

आज मराठवाड्याच्या राजकारणाचा विचार करत असतांना नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाण यांना समर्थ पर्याय आणि तोही भारतीय जनता पार्टीकडून हे प्रतापराव पाटील चिखलीकर हे आहेत. लोकसभा निवडणुकीला काय भूमिका घ्यायची, त्यावेळेस उमेदवार कोण असणार याचा विचार करत असतांना लोहा विधानसभा हा लातूर लोकसभेत आहे आणि या गोष्टीचा विचार करत असतांना सुज्ञ, जाणकार मतदारांनी रात्र वैर्‍याची आहे. मोठ्या प्रमाणात भूलथापा दिल्या जात असतील त्यावर विश्‍वास न ठेवता विकासाचा वेग वाढवण्यासाठी लोहा गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विचाराचे उमेदवार विजयी करणं महत्त्वाचं आहे. 

आपण भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचा विचार केला असतांना सुंदर रस्ते, स्वच्छ पाणी, दिवाबत्ती, आरोग्याच्या सुविधा, स्वच्छता व उद्याचा राष्ट्रीय महामार्गावर येणारी नगर परिषद म्हणून लोह्याकडे पाहत असतांना आपण या निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे. कारण जिल्ह्यामध्ये त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष रातोळीकर आहेत, आ. तुषार राठोड आहेत, माजी खासदार खतगावकर आहेत, भाजपा शहराध्यक्ष आहेत, ओमप्रकाश पोकर्णा आहेत, कंदकुर्ते आहेत आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असतांना सर्वात महत्त्वाची आणि जमेची बाब म्हणजे प्रतापराव हे जातीवाद करत नाहीत, जातीवादाला थारा देत नाहीत म्हणून रमजान महिन्याच्या निमित्ताने जेंव्हा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत कांही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला असतांना मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव, दलित बांधव, कष्टकरी बांधव यासह आठरापगड जातीचे लोक हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत आहेत. आणि म्हणून 17 नगरसेवक आधीक नगराध्यक्ष या सर्व ठिकाणी एक कर्तृत्वान व्यक्तीमत्व, जे बोलतात ते करुन दाखवणारं व्यक्तिमत्व, जे सातत्याने सर्वात मिळून मिसळून राहणार व्यक्तिमत्व आणि एक घडी गेली तर पिढी जाते म्हणून कांही मंडळी वाट्टेल ते करुन या निवडणुकीत प्रतापरावच्या ताब्यात नगर पालिका राहू नये यासाठी शकूनी निती अवलंबू शकतात. 

मतदारांनी जागरुक राहणं गरजेचं आहे. लोहा म्हणजे नांदेड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे. आपण माळेगाव यात्रेसाठी आणलेला निधी पाहिला, रस्ते कामासाठी आणलेला निधी पाहिला आणि खर्‍या अर्थाने भागीरथी प्रयत्न करुन विकासाची गंगा ही लोहा गावातील घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहंचवण्याचा काम करणारा एक निर्भिड, धाडशी आणि सर्वांना विश्‍वासात घेवून काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला म्हणावसं वाटतं, जात, पात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत असा भेदाभेद न करता फक्त एकच लक्ष, फक्त एकच ध्यास लोहा गावचा सर्वांगिण विकास. आणि तो विकास करण्याची धमक, ताकत, कुवत ही प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात आहे. ते विविध निवडणुकीच्या माध्यमातून आपण अनुभवलं आहे. राग नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही, प्रेम, सहानुभूती आणि त्याचबरोबर खर्‍या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे समता, बंधुत्व आणि न्याय या त्रिसूत्रीवर आधारित काम करणारं नेतृत्व हे प्रतापराव पाटील चिखलीकरांचं आहे. 

नुकताच जलयुक्त शिवाराचे काम त्याचे बक्षीस वाटपाचा सोहळा जो केला तो अत्यंत चांगल्या प्रकारचा होता. एवढंच नाही तर नांदेडमध्ये यु.पी.एस.सी. परीक्षेत जे गुणवंत आहेत, जे किर्तीवंत आहेत, जे यशवंत आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... असं म्हटलं पाहिजे. हे म्हणण्याची ताकत, किमया ही फक्त आणि फक्त प्रतापरावांमध्ये आहे. योगायोगाने ते लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. आमदार म्हणून त्यांचं काम सर्वांनी जवळून पाहिलं आहे. पिकविम्याचा प्रश्‍न असेल, पाणीटंचाईचा प्रश्‍न असेल, लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व हे तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणं ही लोहा नगरवासीयांची जबाबदारी आहे असं आम्हाला सांगावसं वाटतं. 9 तारखेला मतदान आहे. आज आणि उद्या अनेक प्रकारे प्रचार तंत्र वापरले जाईल. प्रत्येकांनी मी प्रतापराव आहे, मी भारतीय जनता पक्षाच कार्यकर्ता आहे या भूमिकेतून साथ द्यावी, सहकार्य करावं, घराघरापर्यंत, मनामनापर्यंत हा विचार पोहंचवावा आणि स्वतः उमेदवार समजून नगर पालिकेचे नगराध्यक्ष असतील, प्रभागातील नगरसेवक असतील त्या सर्वांना साथ द्यावी, प्रत्येक मत हे कमळाला द्यावं आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावं की लोह्याची जनता ही प्रतापराव पाटलांच्या पाठीशी आहे, लोह्याची जनता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे, लोह्याची जनता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्यासोबत आहे, लोह्याची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. ज्यांनी निर्णय घेतले. उज्वला गॅस योजनेचा निर्णय घेतला, ज्यांनी निर्णय घेतले राष्ट्रीय महामार्गाचे निर्णय घेतले.

 ज्यांनी निर्णय घेतले सर्वांना स्वतःच्या मालकीचं घरकूल असावं, प्रत्येकाच्या घरी स्वच्छतागृह असावं आणि अशा एका परिस्थितीमध्ये खाजगीत लोक म्हणतात, जिसका कोई नही उसका प्रतापराव पाटील है भाईयो... आणि म्हणून जात, पात, धर्म, पंथ सर्व सर्व सर्व विसरुन सद्सद् विवेक जागृत ठेवून या निवडणुकीत कमळाला मतदान. हे मत प्रतापरावांना असणार आणि या निवडणुकीच्या निमित्ताने दै. मराठवाडा नेताच्या वतीने आम्ही सांगू इच्छितोत, छत्रपती शिवाजी राजेंचा पुतळा येणार्‍या काळात बसवायचा आहे. फक्त छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा नाही तर जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी क्रांतीकारक निर्णय घेतला ज्या क्रांतीकारक निर्णयाच्या माध्यमातून गेल्या 70 वर्षात मराठा समाजाला आरक्षण दिल नाही ते आरक्षण देण्याचं काम या सरकारने केले आहे आणि त्याची पावती म्हणून आगे बढो... म्हणून तमाम लोहाच्या मतदारांनी विक्रमी मतांनी प्रताप घडवावा. 

आणि तो प्रताप संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावा. एक माणसात परमेश्‍वर पाहणारा, श्रद्धा आणि सबुरीच्या मार्गाने काम करणारा नेता म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत. लोहा नगर परिषद मॉडेल नगर परिषद करण्याचं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. ज्यांची परमेश्‍वरावर प्रचंड श्रद्धा आहे आणि अशा एका भूमिकेतून परवा होणार्‍या मतदानात लोहा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवावा आणि दाखवून द्यावं की, तुमच्या निर्णयाच्या सोबत, तुमच्या कार्याच्यासोबत, तुमच्या भूमिकेच्या सोबत आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपण पाहिलं, नुकताच पोहरागड येथे बंजारा समाजासाठी 100 कोटी रुपये खर्चून महामंडळ करण्याची घोषणा केली. येणार्‍या काळात विविध आरक्षणासंदर्भात शासन निर्णय घेणार आहे. यासाठी चला प्रताप घडवा आणि प्रतापरावांना साथ द्या, कमळाला मत द्या.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment