हिमायतनगर/वार्ताहर - तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर हिमायतनगर तालुक्यातील पवना मध्य रस्त्याने जाणार्या 15 क्विंटल गोमांस घेऊन जाणारी महिंद्रा जीप येतील गो- रक्षकांच्या पुढाकारामुळे पकडण्यात आले असून वाहन पकडताच आरोपींची घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांच्या सूचनेने हिमायतनगर पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीना पाठलाग करून पकडले आहे. हि घटना दि.06 रोजी दुपारी घडली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शासनाने राज्यात गोहत्याबंदी घातल्यानंतरही गोमांसाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आसल्याचे उघड झाले आहे. .
तेलंगणा राज्यात निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहे, त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून तस्करी केल्या जाणार्या गोमांसाचा ट्रॅक हिमायतनगर पोलिसांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिमायतनगर तालुक्यातील सरसम - पवना रस्ता मार्गाने महिंद्रा जीप क्रमांक एमएच 26 एडी 3527 यांमधून 25 टॅन गोमांस नेले जात होते. दरम्यान पवना रस्त्यावर वाहनाचा पाट्या तुटल्याने गाडी थांबली, याचा ठिकाणी थोड्या अंतरावर विहिंपचे जिल्हामंत्री किरण बिच्चेवार यांची गोशाळा आहे. ते नेहमीप्रमाणे गुरांना चारा- पाणी करण्यासाठी जातांना त्यांना हि गाडी दिसली.
यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य वाहतूक करणारे कैरेट भरून होते. यावर संशय आल्याने अगोदर त्यांनी चालकाची वीचारपूस केली असता त्याने एका वर्तमान पत्राची वाहतूक करणारी हि गाडी असल्याचे सांगून दिशाभूल केली. दरम्यान श्री बिच्चेवार विचारपूस करत धारेवर धरून जिल्हा पोलीस अधीक्षकांना संपर्क करताच चालक व अन्य एकाने वाहन सोडून धूम ठोकली. तात्काळ पोलीस अधीक्षकांनी हिमायतनगर पोलिसांना माहिती देऊन पाठविले, तसेच फरार झालेल्या आरोपीना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. आणि गाडीचा पंचनामा सुरु करताच बाहेरून भाजीपाल्याचे कैरेट दिसत असले तरी आतमध्ये प्लॅस्टीकच्या निळ्या रंगाच्या टाक्यामध्ये गोमांस भरून तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री काळे व त्यांच्या सहकार्यांनी पंचनामा केला असून, यामध्ये तब्बल 15 क्विंटल गोमांस असल्याचे निष्पन्न झाले. हा मुद्देमाल हिमायतनगर पोलिसांनी ताब्यात घेतात असून, या संदर्भात गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
तस्करांची नामी शक्कल
गोमांसाची तस्करी उघड होऊ नये, कुणालाच संशय येऊ नये म्हणून चक्क जीपच्या वरून आणि पाठीमागून भाजीपाल्याचे कैरेट आणि आतमध्ये प्लस्टिकच्या टाक्यात बर्फाळ पाण्यामध्ये गोमांस होते. एव्हडेच नव्हे तर समोरून गाडीला नंबर असला तरी पाठीमागून गाडीचा नंबर मिटवून राजरोसपणे तस्करी केली जात होती. सुरुवातीला चालकाची वीचारपूस केली असता त्याने एका वर्तमान पत्राची वाहतूक करणारी हि गाडी असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता हे विशेष आहे.
गेल्या वर्षभरापासून नागपुर वरून गोमांस घेऊन तेलंगणामध्ये नियमीत पाठविले जाते. याबाबत अनेकदा तक्रारी केल्या परंतु पोलिसांनी सहकार्य करण्याऐवजी उलट तस्करांना साथ दिली. त्यामुळे आजच्या घटनेची माहिती मी थेट पोलीस अधीक्षक संजय जाधव याना दिली होती. आजची कार्यवाही झाली असली तरी यापुढे महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये होणारी गोमांसाची तस्करी रोकल्या गेली पाहिजे. आज पाहिल्यानंद केलेल्या तक्रारीची दाखल घेण्यात आल्याने पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन करून सर्वानीच आभार मानायला पाहिजे अशी प्रतिक्रिया विहिंपचे जिल्हा मंत्री किरण बिच्चेवार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
No comments:
Post a Comment