भाजपच्या आणखी एका खासदाराचा राजीनामा

Thursday, December 6, 2018


लखनऊः भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेले काही महिने त्या सातत्याने मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढत होत्या. मोदी सरकार दलित विरोधी असल्याचा त्यांनी सातत्याने आरोप केला आहे. पक्षाचा राजीनामा देताना त्यांनी भाजप सरकार हे समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. फुले या लखनऊतील बहराईच मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांनी एप्रिल महिन्यात संविधान बचाव’ रॅली देखील काढली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राम मंदिराची बांधणी सव्वातीन टक्के ब्राम्हणांसाठीच असल्याची टीका त्यांनी केली होती.

No comments:

Post a Comment