नव्या वर्षात व्याजदर घटणार?

Saturday, December 15, 2018



रिझर्व्ह बँकेचे पंचविसावे गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर व्याजदरांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरात घट करून कर्जदात्यांना दिलासा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

स्टेट बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार व्याजदरांमध्ये कपात केल्यास केंद्र सरकारला जीडीपीचा वेग वाढविण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरात कपात करण्याविषयीचे सूतोवाच करण्यात येईल. पुढील वर्षी कच्च्या इंधनाच्या दरात वाढ होण्याची कोणतीही शक्यता वाटत नाही. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे जगातील आघाडीची अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेचा विकासदर घटत आहे. केवळ अमेरिकेचाच नाही तर, देशाचाही विकासदर घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला असून, वित्तीय तुटीचे निर्धारित लक्ष्य गाठणे शक्य होणार आहे. 

नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई २.३३ टक्क्यांसह गेल्या १७ महिन्यांतील नीचांकी पात‌ळीवर पोहोचली आहे. बाजाराने गृहीत धरलेल्या मर्यादेपेक्षाही महागाईचे प्रमाण कमीच आहे. भाजीपाला, अंडी आणि डाळींच्या भावांतही घट झाल्याचे दिसून आले आहे. एचडीएफसी बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ अभिक बरूआ यांच्या मते व्याजदरांमध्ये घट होण्याची शक्यता वाटण्यामागे महागाईत कमालीची घट होणे हे एक प्रमुख कारण आहे. 

No comments:

Post a Comment