भांडणातून मुलाकडून आईची हत्या

Saturday, December 15, 2018



पत्नी आणि आईमधील रोजच्या भांडणाला कंटाळून मुलाने केलेल्या मारहाणीमध्ये ६५ वर्षीय आईचा मृत्यू झाला. गोरेगावच्या दिंडोशीमध्ये ही घटना घडली. सरस्वती विश्वकर्मा असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी आनंद विश्वकर्मा (३२) याला अटक करण्यात आली आहे.दिंडोशीमधील एका सोसायटीमध्ये आनंद पत्नी, आई आणि बहिणीसोबत राहतो.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

आईचे आणि पत्नीचे पटत नसल्याने त्यांच्यात रोज भांडण होत. एका खासगी बँकेत व्यवस्थापकपदावर काम करणारा आनंद त्यांच्या रोजच्या वादाला कंटाळला होता. भांडणामध्ये नेमकी कोणाची बाजू घ्यायची असा प्रश्न पडत असल्याने तो रोज उशिरा घरी यायचा. मंगळवारी तो दारू पिऊन घरी आला तेव्हा नेहमीप्रमाणे भांडण सुरू होते. रागाच्या भरात त्याने पत्नी, आई आणि बहिणीला जबर मारहाण केली. यात आई बेशुद्ध पडली. तिला आधी जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणि नंतर प्रकृती गंभीर झाल्याने कुपर रुग्णायलात हलवण्यात आले. बुधवारी रात्री उपचारादरम्यान सरस्वती यांचा मृत्यू झाला. पत्नीने केलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आनंदला अटक केली.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.

No comments:

Post a Comment