सध्या आपल्याला कपड्यांमध्ये अनेक प्रकार बघायला मिळतात. पण एक प्रकार असाही आहे जो कित्येक वर्षांपासून आपण वापरतो आहे, तो म्हणजे ‘शर्ट’. शर्ट हा इतर सर्व कपड्यांच्या तुलनेत अधिक सोयीस्कर ठरतो. कारण तो आपण ऑफिस ते एखादी पार्टी किंवा समारंभात सहज कॅरी करू शकतो. म्हणूनच मुलं असो वा मुली दोघांनाही शर्ट आवडतो.
पण तुम्ही कधी आपल्या शर्टाच्या बटणांकडे लक्ष दिले का? ती बटणं पुरुषांच्या शर्टाला वेगळ्या बाजूने तर स्त्रियांच्या शर्टाला वेगळ्या बाजूने असतात. पुरुषांच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला असतात, तर स्त्रियांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूने असतात. शर्टाच्या बटणा वेगवेगळ्या बाजूला असण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
यामागील खरं कारण काय हे तर स्पष्ट नाही, पण काही लोकांनी यामागे काय-काय कारणं असू शकतात त्याबाबत अंदाज बांधले आहेत.
क्वोराच्या एका यूझरच्या मते, स्त्रिया आपल्या बाळांना डाव्या हाताने पकडतात जेणेकरुन बाळाला दुध पाजताना त्या उजव्या हाताने आपले कपडे सांभाळू शकतील. म्हणून स्त्रियांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूने असतात. तर पुरूष ज्यांचं काम युध्दात लढणे, रक्षा करणे इत्यादी असायचं, ते डाव्या हातात तलवार पकडायचे. घोडेस्वारी करत असताना पुरूष डाव्या बाजूला तलवार ठेवतं, त्यामुळे त्यांना उजव्या बाजूला बटण असणे अधिक सोईस्कर होत असे. त्यामुळे त्यांच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला असायची.
जेव्हा बटणं असलेले शर्ट किंवा ब्लाऊज परिधान करण्याची फॅशन आली, तेव्हा फक्त श्रीमंत घरातील स्त्रियाच या कपड्यांचा वापर करत असतं. या श्रीमंत स्त्रियांना तयार करण्यासाठी मेड असायच्या, त्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून या बटणा विरुध्द बाजूने देण्यात आल्या असाव्या.
यामागे आणखी एक थिअरी सांगितली जाते, फ्रांसचा सम्राट नेपोलियन याला आपला उजवा हात शर्टमध्ये घालून वावरायची सवय होती. काही काळाने फ्रांसमधील स्त्रियांनी त्याचे अनुकरण करण्यास सुरूवात केली. ज्यानंतर नेपोलियन असा आदेश दिला की, सर्व स्त्रियांनी शर्टच्या उलट्या बाजूला बटणं लावावीत. ज्यानंतर स्त्रियांनी शर्टच्या उलट्या बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला बटणा लावण्यास सुरवात केली.
No comments:
Post a Comment