बाला रफिक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी

Monday, December 24, 2018


 जालना - बाला रफिक शेख 62 व्या वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने 11-3 इतक्या गुणफरकाने पराभूत केले आहे.

अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान असला तरी. बाला रफिकने त्याच्यावर मात केली आहे. तिसऱ्यांदा मॅट विभागाची सेमीफायनल जिंकून अभिजीत फायनलमध्ये पोहोचला होता. परंतु बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने हा सामना एकतर्फी जिंकला आहे.

पुण्याचा अभिजीत कटके की बुलडाण्याचा बाला रफिक शेख कोण होणार 'महाराष्ट्र केसरी' याची उत्सुकता महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना लागली होती. जालन्याच्या आझाद मैदानात आज सायंकाळी दोघांमध्ये सामना झाला. या सामन्यात बालाने गतविजेत्या अभिजीतवर मात केली आहे.

No comments:

Post a Comment