'मोदी नको, गडकरी हवेत' या मागणीवर गडकरी म्हणतात ....

Friday, December 21, 2018

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर आता नरेंद्र मोदींना आव्हान दिलं जात आहे. आता मोदी नको आता भाजपचे नेतृत्व गडकरींकडे द्या, अशी मागणी करणारे पत्र सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात आलं आहे. शेतकरी नेते आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

त्यानंतर भाजपमध्ये खरंच नेतृत्व बदल होणार का, याविषयी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. आता अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2019 मध्येही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान - गडकरी.

'मी आहे त्या पदावर खूश आहे. त्यामुळे मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. 2019 मध्येही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील,' असा पुनरुच्चार गडकरींना केला आहे. नितीन गडकरींनी याबाबत थेट प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

No comments:

Post a Comment