अहमदपुर-चाकूर तालुक्यासाठी १ कोटी 35 लाखाचा निधी आ. विनायकराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Saturday, December 1, 2018

लातूर :निवडुन आल्यानंतर विकासकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आ विनायकराव जाधव - पाटील यांनी नवा आदर्श घालुन दिला आहे जनतेच्या सुविधांसाठी सतत धडपडणाऱ्या आ पाटील यानी मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांसाठी जवळपास दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे . या निधीतुन मतदारसंघात विविध विकासकामे होणार असल्याची माहिती त्यानी दिली .

आ पाटील हे सतत विकासकामांसाठी प्रयत्नात असतात जनतेला दिलेली आश्वासने त्यानी केंव्हाच पूर्ण केली आहेत आता आणखी काही नवे देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे .याचाच एक भाग म्हणून हा १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी त्यानी मंजूर करून घेतला आहे. या निधीतुन थोडगा येथे सेवाभवन उभारले जाणार आहे . यासाठी ७ लक्ष रु खर्च केले जाणार आहेत .

तुळशीराम तांडा सेवाभवन बांधण्यासाठी ७ लक्ष रु , वरवंट तांडा सेवाभवन ७ लक्ष रु तसेच उध्दव तांडा ,
वडाखाडी तांडा, राळगा तांडा येथेही सेवाभवन उभारण्यासाठी प्रत्येकी ७ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे .जोडवाडी तांडा येथे सिमेंट रस्त्यासाठी ५ लक्ष रु ,हणमंतवाडी तांडा येथे सेवाभवन उभारण्यासाठी ६ लक्ष रु तर फतुनाई तांडा सेवाभवन साठी ७ लक्ष रुपये आ . पाटील देणार आहेत .

सेवापुर तांडा सभागृह बांधकामाला १० लक्ष रु., शंकरनगर तांडा सेवाभावनला ७ लक्ष रु.तर देवनगर तांडा सेवाभवनसाठी ७ लक्ष रु.ते देणार आहेत .सेवापुर तांडा (आष्टा )येथे सेवाभवन बांधण्यास ७ लक्ष रु., सेवापुर तांडा ( आष्टा)येथे सिमेंट रस्ता ७ लक्ष रु, उजळंब सिमेंट रस्ता , नाली बांधकाम ६ लक्ष रु.असा निधी आमदारांकडुन दिला जाणार आहे .थावरा तांडा सिमेंट रस्ता ३ लक्ष रु ,फोमा तांडा सिमेंट रस्ता ३ लक्ष रु, गंगा हिप्परगा सिमेंट रस्ता ३ लक्ष रु , हगदळ सिमेंट रस्ता ६ लक्ष रु, शिंदगी खु सिमेंट रस्ता ३ लक्ष रु, सावरगाव सिमेंट रस्ता ५ लक्ष रु या कामानाही मंजुरी देण्यात आली आहे .वायगाव सिमेंट रस्ता ५ लक्ष रु,गुट्टेवाडी सिमेंट रस्ता ५ लक्ष रु आदी कामाचा यात समावेश करण्यात आला आहे.

प्रामूख्याने अहमदपूर- चाकुर विधान सभा मतदारसंघात वंसतराव नाईक तांडा वस्ती सुधारणा करण्यासाठी सूध्दा भरीव अशी तरतूद आमदार विनायकराव पाटील यांनी मंजूर करून घेतली होती.आता मतदार संघातील वंसतराव नाईक तांडा वस्ती सुधारणा करण्यासाठी हा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे.

मतदारसंघाला हा निधी मंजूर केल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मंत्री राम शिन्दे, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आमदार विनायकराव पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. हा निधी खेचून आणल्याबद्दल मतदार संघातील जनतेच्या वतीने आ.विनायकराव पाटील यांचे अभिनंदन होत आहे.आ पाटील यांचासारखा आमदार मिळाल्यामुळेच मतदारसंघाचा विकास गतिमान झाला आहे .

No comments:

Post a Comment