लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी चला तुम्हीही बोला !

Monday, December 3, 2018


दैनिक मराठवाडा नेता आपण दररोज वाचता .या माध्यमातून विविध विषय आम्ही आपल्यासमोर आणतो ,समस्या मांडतो. प्रसंगी काही सूचनाही करतो.

आपला मराठवाडा नेता अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा ,वाचकांसाठी परिपूर्ण असावा यासाठी नव्या वर्षापासून यात काही बदल आम्ही करू इच्छितो. आजही मराठवाडा नेता लातूरसह नांदेड ,बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगात कुठेही मराठवाडा नेता वाचता येतो .आपल्या दैनिकात सामान्य नागरिक, महिला ,युवक ,वृद्ध ,खेळाडू, राजकीय मंडळी यांच्यासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न आम्ही सतत करत असतो. तरीही जोपर्यंत जनतेची 'मन की बात' येणार नाही तोपर्यंत आम्ही  'जन की बात' देऊ शकणार नाही .

जनतेचे मत जाणून घेण्यासाठी वाचकांशी संवाद साधावा लागतो ,हितगुज करावे लागते. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी व्हाव्या लागतात. असं झालं तरच खऱ्या अर्थाने आपला मराठवाडा नेता लोकशाहीचे व्यासपीठ ठरणार आहे. यासाठीच काही बदल केला जाणार आहे .हा बदल नेमका काय असावा ?मराठवाडा नेता मध्ये आणखी वाचनीय काय असावे? यासाठी आपल्या सूचना अपेक्षित आहेत. वंचित घटक ,प्रसिद्धीपासुन पासून दूर असणारे सामाजिक कार्य,  जनसेवा यासह समाजातील प्रत्येक घटकासाठी आणखी काय देता येऊ शकते याच्या सूचना आम्हाला करा. आपल्याला जे वाटेल ते आमच्या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवा .आपण सांगितलेल्या सूचनांची नक्कीच दखल घेतली जाईल. ज्ञान ,विज्ञान ,मनोरंजन, राजकारण यासह जे जे हवं ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करू .आपल्या सूचनांच्या प्रतीक्षेत ...

आपलाच रामेश्वर बद्दर रेणापूरकर
(संपादक )
व्हाट्स अप क्रमांक
७३५०८१९९९९

No comments:

Post a Comment