Friday, November 30, 2018November 30, 2018
मुंबई- १६ बालमृत्यु हे कुपोषणामुळे झालेले नसून कमी दिवसाची प्रसुती, जन्मत: श्वसनाचे आजार, सेप्सीस, जन्मत: कमी वजन, निमोनिया इ. विविध कारणामुळे झालेले असून शासनाने विविध उपाययोजना केल्यामुळे आदिवासी भागात सुध्दा बालमृत्युच्या प्रमाणात मोठी घट झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
बालमृत्युचे प्रमाण सांगताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, आदिवासी जिल्ह्यात सन २००३-०४ मध्ये
० ते १ वर्ष वयोगटातील ५ हजार ४१५ बालकांचा मृत्यु झाले. तर १ ते ६ वर्ष वयोगटातील २ हजार ६०९ बालकांचा मृत्यु झाले. शासनाने विविध उपाययोजना केल्यामुळे सन २०१८-१९ च्या सप्टेंबर अखेर हेच प्रमाण ० ते १ वर्ष वयोगटात ९५० आणि १ ते ६ वर्ष वयोगटात २३३ बालमृत्यु झाले.
ना. पंकजा मुंडे म्हणाल्या की, एकात्मीक बालविकास योजनेंतर्गत कुपाषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर, स्तनदा माता यांना नियमित पूरक आहार देण्यात येतो. या व्यतिरिक्त SAM बालकांसाठी राज्यातील आदिवासी तसेच बिगर आदिवासी भागामध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्यात आले आहे.
आदिवासी प्रकल्पामध्ये अमृत आहार योजना सुरु असून ह्या योजनेंतर्गत गरोदर, स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्यात येतो. तसेच ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना आठवड्यातून ४ दिवस अंडी व केळी पुरविण्यात येतात. तसेच प्रतिदीन शाकाहारी बालकांना २ केळी व मांसाहारी बालकांना १ अंडे देण्यात येते.
राज्यातील अतिसंवेदनशील आदिवासी जिल्ह्यामध्ये तेथील जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना राबविण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, योजनांची अंमलबजावणी, कार्यपध्दतीमध्ये इतर विभागांशी असलेला समन्वय, सूचनांचे व योजनांचे संनित्रण करण्यासाठी गाभा समिती गठीत करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या विविध उपाययोजनेमुळे बालमृत्युत घट- महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे

By Marathwada Neta
Friday, November 30, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment