Tuesday, December 25, 2018December 25, 2018
भंडारा: भंडारा येथे आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेवेळी देण्यात आलेल्या जेवणातून 174 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने भंडारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पूर्व विदर्भातील अनुदानित आणि विनाअनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी भंडारा येथील शिवाजी क्रीडा संकुलमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत सुमारे 2500 विद्यार्थी सहभागी झाले होते. आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. त्यावेळी अन्न आणि पाण्यातून जवळपास 174 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. जेवणानंतर मळमळ होणे, डोकेदुखी, जुलाब, उलट्यांचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपचारानंतर 97 विद्यार्थ्यांनी प्रकृती स्थिर असून त्यांना क्रीडा संकुलात विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे. तर 19 विद्यार्थ्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. या संपूर्ण घटनेसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजक जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आयोजकांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
भंडाऱ्यात 174 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

By Marathwada Neta
Tuesday, December 25, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment