पंचायत समितीच्या सभागृहात अयोजीत करण्यात आलेल्या सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अमिता चव्हाण या होत्या तर प्रमूख पाहुणे म्हणून मंचावर खा आशोक चव्हाण , काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर ,जिल्हा परिषद सदयस्य बाळासाहेब पाटील रावनगावकर , प्रकाश देशमुख भोसीकर , मंगाराणी अंबुलगेकर ,रविरेड्डी सुकुंरवाड ,सभापती झिम्माबाई चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर , पंचायत समीतीचे उपसभापती सुरेश बिल्लेवाड , तहसीलदार व्यंकटेश मुंढे , गट विकास अधिकारी रामोड , काँग्रेस प्रवक्ता पांडागळे , केशव पाटील पोमनाळकर , सामाजीक कार्यकर्ते युसूफ शेख ,गंपु पाटील , रामचंद्र मुसळे , बाबुराव सायाळकर , विक्रम क्षिरसागर, सिद्धेश्वर पिटेलेवाड , नगरसेवक मनोज गिमेकर , राजु पाटील दिवसीकर , वंसत जाधव पिपंळढवकर यांची उपस्थिती होती.
येणाऱ्या उन्हाळ्याच्या पार्शवभूमीवर भोकर तालुक्यातील कोणत्याही गाव -वाडी, तांड्यास पाणी टंचाई भेडसावणार नाही या दृष्टीने तालुका प्रशासनाने नियोजन करावे अश्या सुचना तहसिलदार व्यंकटेश मुंढे , गटविकास अधिकारी आर.एल. रामोड सह अन्य संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या महिनाभरात तालुक्यातील सर्व विंधन विहीरी सुरू झाल्या पाहीजेत त्यासाठी काही मदत हवी असल्यास जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलून सोडवण्याचा वैयक्तीक प्रयत्न करेन या कामात हयगय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी तंबी दिली.
तालुक्यात एकूण ३६ डि.पी या बंद अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व ग्रामस्थांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या बंद डीपी येणाऱ्या बारा दिवसात कुठल्याही परिस्थितीत चालु झाल्या पाहिजेत यानंतर मी किंतू परंतू ऐकून घेणार नाही सरळ कार्यालयावर मोर्चा काढेन. ज्या गावांना खांबांची गरज आहे तेथे खांबे पुरवावेत विज नसेल तर पाणी मिळण्याचा प्रश्नच नाही म्हणून प्रत्येक गावात विज चालू झाली पाहीजे असे विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडसावले यावेळी आधिकाऱ्यांनी येणाऱ्या दहा दिवसात बंद डी.पी ह्या पूर्ववत चालू करू असे अभिवचन दिले.
दरम्यान खा. चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नांने अधिकाऱ्यांची भांबेरी ऊडाल्याचे दिसून आले. या बैठकीत भोकर तालुक्यात करण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयाच्या विकास कामाची माहिती खा . चव्हाण यांनी देऊन येणाऱ्या काळात भोकर तालुक्यास कुठलीही निधी कमी पडू देणार नाही . भोकर हो माझे घर आहे घरची काळजी घेणे हे कुटूंब प्रमुखाचे काम असते तसे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही .
तालुक्यातील निर्माण समस्याचे निराकरण करणे हे माझे कर्तव्य समजतो असे शेवटी म्हणाले. या महत्वपूर्ण बैठकीत प्रोसीडिंग लिहणारा कर्मचारी उपलब्ध नव्हता तेंव्हा खा. चव्हाण हे संतप्त होऊन आजच्या आज प्रोसेडींग लिहण्यास अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी रामोड यांना दिल्या या बैठकीचे प्रास्ताविक रामोड यांनी केले तर सुत्रसंचलन आभार यशवंतकर यांनी मानले यावेळी सभागृहात ढिसाळ नियोजनाविषयी हशा ऊडाला.

No comments:
Post a Comment