शिवलीच्या अशोक जंगमेने पटकावले भारतासाठी रौप्य पदक

Sunday, November 25, 2018

लातूर (प्रतिनिधी):- जयपूर राजस्थान येथे झालेल्या कॉमनवेल्थ ग्रॅण्ड मास्टर आंतराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत ४० ते ५० वर्ष वयोगट, व ७३ की.ग्राम वजनगट. शिवली ता औसा येथील रहिवाशी आणि औरंगाबाद येथे कंपनीत काम करत असलेल्या अशोक हिराचंद जंगमे यांनी भारतासाठी रौप्य पदक मिळवले. आहे. 
जिल्हा संघटनेच्या बाजजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या परमेश्वरी देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रात ते सराव करतात. त्यांना मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे यांचे मार्गदर्शन लाभले. जंगमे हे नॅशनल लेव्हल ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडिया चा सेकंड दान ब्लॅक बेल्ट परीक्षा पास उत्तीर्ण आहेत. ते स्वत: परमेश्वरी देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रात गेल्या २० वर्षांपासून खेळाडूंना मार्गदर्शन करतात. त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडवली आहेत. ते सध्या गुडईअर साऊथ एशिया टायर्स प्रा. लि, वाळुज औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. अशोक जंगमे यांनी १ ली ते ७ वी पर्यन्त चे शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिवली तर ७वी ते १० वी पर्यन्त चे शिक्षण श्री हनुमान विद्यालय शिवली येथे पूर्ण केले आहे.

त्यांना राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, गुडईअर टायर्स कंपनीचे संचालक, मिलिंद बसोले, मिलिंद काटेकर, उदयकुमार चोबे, जी. रघूराम, गजराज डोगरा, जिवन पाठक, दत्तात्रय बोठे, युनिअनचे अध्यक्ष अर्जुन पिटेकर, राजेंद्र देवकर, काशिनाथ साळूंके, गोरख शेळके, सर्व यूनियन कमिटी व क्लबचे अध्यक्ष अनिल पवार, मनोहर देवानी, श्रीनिवास नंदमुरी, नामदेव दौड, सुनिल साखरे सुधीर काटकर , शैलेश कावळे, ऋतुजा सौदागर, कल्याणी शेटकर, श्रीकृष्ण भोळे, विजय साठे, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment