खुशखबर नवं वर्षांपासून ७ वा वेतन आयोग लागू होणार!

Friday, November 30, 2018


मुंबई : 
महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारी गोड बातमी दिली आहे फडणवीस सरकारने नवं वर्षांपासून आर्थात १ जानेवारी २०१९ पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे अनेक वर्षांपासून कर्मचारी संघटनानी या साठी पाठपुरावा केला होता सरकारच्या या निर्णयामुळे 17 लाख कर्मचारी आणि साडे सहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्यातही आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केलं होतं. त्याची दखल घेत आयोगाच्या शिफारशी कशा लागू करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.


के पी बक्षी समितीचा अहवाल 5 डिसेंबरपर्यंत सरकारला प्राप्त होईल. या समितीच्या शिफारशी स्वीकारुन सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. बक्षी समितीचा अहवाल यायला विलंब झाला तरी एक जानेवारीपासूनच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.

राज्य सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान 21 हजार रुपये वेतन लागू करावं, अशी मागणी कपिल पाटील यांनी यावेळी केली. त्यावर सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना वीस हजारांपेक्षा जास्तच वेतन मिळेल असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment