मृतदेहावर केला बलात्कार

Friday, November 30, 2018



नागपूर :सख्या भावाची बायको आणि त्याच्या तीन वर्ष वयाच्या मुलीचा खून करून मृतदेहावर बलात्कार करण्याचा प्रकार नागपूर मध्ये घडला असून पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे .ब्लू फिल्म पाहण्याचे व्यसन असल्याने त्या भरातच हे कृत्य आपण केल्याची कबुली त्या नराधमाने दिली आहे.

नागपूर येथील वडधामना परिसरातील रहिवासी राकेश बिंड हे ट्रकचालक आहेत .ते अनेकदा बाहेरगावी असतात. अशावेळी त्यांची पत्नी प्रतिभा आणि तीन वर्ष वयाची मुलगी रागिनी या घरी असायच्या . दिनांक 28 नोव्हेंबरच्या रात्री त्या दोघीही घरातच मृतावस्थेत आढळल्या होत्या .या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली .मुळात प्रतिभा बिंड या मुस्लिम होत्या. राकेशसोबत त्यांचा विवाह झाल्यामुळे कुटुंबीय नाराज होते .

अशातच डी फार्म केलेला त्यांचा दीर चंद्रशेखर याने हे कृत्य केले. चंद्रशेखर हा एका औषधाच्या दुकानात कामाला आहे .त्याला ब्लू फिल्म आणि पॉर्न साईट्स पाहण्याचे व्यसन होते .तो कायमच वासनेच्या धुंदीत असायचा .या धुंदीतच त्याने हे कृत्य केले असल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. सख्या दिरानेच भावजय आणि पुतणीचा खून केला व मृतदेहावर बलात्कार केला. नागपुर परिसरात या प्रकरणाची चर्चा होत आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment