तुळजापुर तालुका टंचाई अनुशंगाने अामदार मधुकरराव चव्हाण यांची चार तास अाढावा बैठक

Saturday, November 24, 2018




तुळजापुर
तुळजापुर तालुक्यातील दुष्काळग्रस्त स्थितीचा अाढा घेताना डिसेंबर अखेरपर्यत मंजुर वीस विहिरीचे काम सुरू करा असू अादेश अामदार मधुकरराव चव्हाण यांनी तालुका अाढावा बैठकीत दिले.
तुळजापुर तालुका पंचायत समितीमध्ये अामदार मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई स्थितीचा अाढावा घेण्यात अाली. यावेळी 

उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे,सभापती शिवाजी गायकवाड, माजी सभापती प्रकाश चव्हाण, जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, बालाजी बंडगर, अशोक पाटील, विजय शिंगाडे, पं.सं सदस्य शरद जमदाडे ,तहसिलदार योगिता कोल्हे, गटविकास अधिकारी एस.एस. ढवळशंख अादिची उपस्थिती होती.

तुळजापुर तालुक्यातील पाणीपुरवठ्याच्या योजनांची स्थिती कशी अाहे व त्यातील किती योजना चालु स्थितीत तर किती योजना दुरूस्तीच्या प्रतिक्षेत अाहेत याची माहिती अामदार मधुकरराव चव्हाण यानी घेतली. नवीन वीस गावामध्ये सार्वजनिक पाण्याच्या विहीर योजनेस मंजुरी अाणली असुन दोन महिन्यापासुन या विहिरीचे काम चालु नाही याअनुशंगाने गावनिहाय अडचणीची माहिती घेवुन कायदयाला अनुसरून योग्य कार्यवाही करून प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी टंचाई काळातउपलब्द होण्यासाठी कार्यवाही करण्याचे अादेश देत डिसेंबर अखेरपर्यत या योजना चालु झाल्या पाहिजेत असे अादेश दिले. याप्रकरणी तहसिलदार व गटविकासअधिकारी यांची योग्य ती मदत घेण्याची सुचनाही करण्यात अाली. 

अापसिंगा गावासाठी पं.स.सदस्य शरद जमदाडे यांनी गावाची पाण्याची टाकी नादुरूस्त झाली असुन नवीन टाकीची मागणी केली. दहाटणा, कुन्सावळी, वाणेगांव, कसई,बोरगांव, खडकी,काञी, किलज, कामठा, मारखोडी तांडा, येडोळा तांडा, सलगरामड्डी, अारबळी, बसवंतवाडी या गावातील तक्रारीची माहिती घेवुन अामदार चव्हाण यांनी महत्वाच्या सुचना केल्या. घरकुलयोजना कार्यवाही बाबतचा अाढावा घेवुन याअनुशंगाने सुचना केल्या.

No comments:

Post a Comment