पोलिसासह वकील एसीबीच्या जाळ्यात

Friday, November 23, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अदखलपात्र गुन्ह्यात पुढील कारवाई न करण्यासाठी शहर ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्यांनी खाजगी वकिलामार्फत तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना बस स्थानक परिसरात गुरुवारी सायंकाळी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

या बाबत अधिक माहिती अशी की, येथील शहर पोलीस ठाण्यात तक्रार दारावर अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. सदरील गुन्ह्यात पुढील कारवाई न करण्यासाठी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोहम्मद वसीयोद्दीन याने तक्रारदार कडे तीन हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी 19 नोव्हेंबर रोजी या बाबत एसीबीकडे तक्रार दिली होती. 

या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी मोहम्मद वसीयोद्दीन याच्या सांगण्यावरून खाजगी वकील काझी नईमुद्दीन सलाउद्दीन याला पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या माणिक स्मारक आर्य विद्यालय समोरील रस्त्यावर तीन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही, कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, उमर शेख, अभिमन्यू कांदे, संतोष दुमाने, महारुद्र कबाडे, विजयकुमार उपरे, जमीर शेख, प्रमोद थोरात,आवि कीर्तनकार, विनोद देशमुख, गजानन आगलावे यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment