बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने कोट्यवधी प्रेषकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रियंका आता गुंतवणूकदाराच्या रुपात दिसणार आहे. प्रियंका आता लवकरच डेटिंग ॲप घेऊन घेत आहे. प्रियंकाने नुकतीच दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
यातील एका कंपनीचा लवकरच भारतातदेखील विस्तार होणार आहे. प्रियंकाने गुंतवणूक केलेल्या या दोन्ही कंपनी टेक स्टार्सअप आहेत. यातील पहिली कंपनी सॅन फ्रान्सिस्कोची 'होल्बर्टन' ही कंपनी असून, ती कोडिंग एज्युकेशन कंपनी आहे. तर दुसरी कंपनी डेटिंग ॲपची असून तिचे नाव 'बंबल' असे आहे. प्रियंकाने गुंतवणूक केलेली 'बंबल' या कंपनीचा विस्तार भारतातही होणार आहे. 'बंबल' हे डेटिंग ॲप महिलांच्या सुरक्षेसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांसाठी गुंतवणूक, सोशल ट्रान्सफॉर्मेशन आणि आणि त्यांची आर्थिक वृद्धी गरजेची आहे. महिलांना केवळ चूल आणि मूल एवढेच आयुष्य नाही. तिलादेखील तिचे करिअर आहे. यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असून, या ॲपच्या मदतीने महिलांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. महिलांना प्रेम हवे आहे. तिला मैत्री हवी आहे. तिला करिअर हवे आहे. 'बंबल' हेच करते. माझ्यासाठी हा नवा चॅप्टर आहे. दोन टेक स्पेस कंपन्यांसोबत जुळून मला आनंद होत आहे, असे प्रियंकाने म्हटले आहे..

No comments:
Post a Comment