आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा

Friday, October 5, 2018


नवी दिल्ली: 
व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना झुकते माप देण्याचा आरोप असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोच्चर यांनी अखेर मुदतीआधीच सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यांनी केलेला सेवानिवृत्तीचा अर्ज बँक व्यवस्थापनाने मंजूर केला आहे. तसेच चंदा कोच्चर यांनी आयसीआयसीआय बँक आणि अन्य सहयोगी कंपन्यांच्या संचालक मंडळांवरुन देखील राजीनामा दिला आहे. गुरुवारी आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने चंदा कोच्चर यांची मुदतपूर्व निवृत्तीची विनंती मान्य केली असून त्यांना तात्काळ सेवामुक्त करण्यात आले आहे

त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांची निवड करण्यात आली आहे. बक्षी यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी करण्यात आली असून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. विशेष म्हणजे कोचर यांनी राजीनामा दिल्याची खबर येताच आयसीआयसीआय बँकेचे शेअर ५ टक्क्यांनी वधारले आहेत.

No comments:

Post a Comment