आता वेळ अभ्यासाची...

Monday, October 1, 2018

सहामाही परीक्षा जवळ येत आहे. अनेक शाळांनी सहामाही परीक्षेचा पोर्शनही ठरवून टाकला असेल. त्यामुळे मजा करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. सहामाही ही शैक्षणिक वर्षातली अत्यंत महत्त्वाची अशी परीक्षा असते. या परीक्षेवर बरंच काही अवलंबून असतं. सगळे पेपर १०० मार्कांचे असतात. त्यामुळे कमी अभ्यास केला तर मार्कही कमी मिळणार हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. 

मौजमजा, मस्तीसोबत अभ्यासालाही थोडा वेळ द्यायला हवा. तुमच्या मार्कांवर बरंच काही अवलंबून असतं. त्यातच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा बरंच काही देऊन जाणारी असते. आपली तयारी योग्य पद्धतीने सुरू आहे किंवा नाही याचा अंदाज या परीक्षेत घेता येतो. सहामाही परीक्षेसाठीचा अभ्यासक्रमही बराच जास्त असतो. हा सगळा अभ्यासक्रम दहा­-पंधरा दिवसांत पूर्ण करणं शक्य नसतं. त्यामुळे थोडं गंभीर व्हा आणि अभ्यास करा. सध्या तुमच्यावर परीक्षेचा प्रचंड ताण असतो. पण मित्रांनो, खूप ताण घेऊ नका. नियोजन करून अभ्यास केला तर चांगले गुण मिळवणं कठीण नाही. कठीण वाटणारे विषय मागे ठेऊ नका. उलट त्या विषयांना प्राधान्य द्या. कठीण विषयांचा अभ्यास करण्याच्या नादात सोप्या विषयांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. यंदा दिवाळी लवकर आहे. म्हणजे परीक्षाही लवकरच असेल. त्यामुळे आळशीपणा सोडा आणि अभ्यासाची उजळणी करायला घ्या. .

No comments:

Post a Comment