कंधार :भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेच्या हिताची अनेक कामे केली आहेत या कामांची माहिती घराघरात आणि मनामनापर्यंत पोहोचवा असे आवाहन भाजपा नेते ,पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आ राम पाटील रातोळीकर ,माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आणि लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले .
कंधार तालुक्यातील बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात मान्यवर नेते बोलत होते आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राज्यातील बुथ पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला त्यावेळी शहा यांनी प्रत्येक बुथची अवस्था काय आहे ,कोणती कामे झाली आहेत ,योजनांचा लाभ किती जनाना झाला आहे ,कोण व्यक्ती आणि नेता पक्षाच्या जवळ येवू शकतो ,कोण लांब जात आहे आपल्या भागात कोणते प्रकल्प सुरू आहेत याची माहिती जनतेला देण्याचे काम बुथ प्रमुखांनी करावे असे सांगितले होते त्या पार्श्वभुमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता .
यावेळी बोलताना भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे बुथ प्रमुखाने प्रत्येक पातळीवर सजग राहुन काम केले पाहिजे आपल्या भागात शासकीय योजनेचे लाभार्थी किती आहेत ,आणखी किती जणाना योजनांचा लाभ मिळू शकतो याची माहिती घेतली पाहिजे पक्षाचा कार्यक्रम ,धोरणे आणि चिन्ह प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे असे ते म्हणाले .
जिल्हाध्यक्ष तथा आमदार रातोळीकर म्हणाले की बुथ प्रमुखाला सुक्ष्म अभ्यास असला पाहिजे आपल्या कार्यक्षेत्रातील किती जण गावात राहतात किती जण बाहेर गावी राहतात याची माहिती असली पाहिजे किती जणाना शासकीय अनुदान मिळाले पीक विमा किती जणाना मिळाला याची माहिती जवळ ठेवली पाहिजे विरोधकांनी टीका केली तर त्याला उत्तर दिले पाहिजे असेही ते म्हणाले जे काम मागच्या साठ वर्षात झाले नाही ते केवळ चार वर्षात झाले आहे ही बाब आपण पटवून दिली पाहिजे असे ते म्हणाले .
प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की भाजपा सरकारने हगणदारी मुक्त गाव निर्धूर गाव यासारख्या योजना राबविल्या आहेत महामार्गांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत गावोगाव रस्ते नव्याने तयार होत आहेत प्रत्येक घरी गॅस असावा अशी योजना शासन राबवित आहे या योजना जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यानी केले .पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

No comments:
Post a Comment