कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तोकडे कपडे परिधान करून अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना देवीच्या दर्शनास बंदी करण्यात येणार आहे. दर्शनावेळी पुरूषांसाठी शर्ट पँट, धोतर, लुंगी तर महिलांसाठी साडी, पंजाबी ड्रेस, लांब स्कर्ट असा पोषाख बंधनकारक करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आला. नवरात्र उत्सवापासून निर्णयाची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. समितीच्या अखत्यारितील साडेतीन हजार मंदिरांबाबतही हा निर्णय घेतल्याचेही देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी जाहीर केले.
यावेळी जाधव म्हणाले, देशभरात तिरुपती तथा अन्य बड्या मंदिरांमध्ये धोती-कुडता किंवा साडी अशा पोशाखाशिवाय प्रवेश दिला जात नाही. काही दिवसांपूर्वी शेकडो भाविकांनी अंबाबाई मंदिरातही ड्रेसकोड नियम लागू करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार समितीच्या बैठकीत शॉर्ट, हाफ पँट म्हणजेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम स्त्री-पुरुष दोघांनाही समान लागू आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवापासून चुडीदार, साडी, पूर्ण शर्ट-पँट असे कपडे परिधान केलेल्या भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे..

No comments:
Post a Comment