दिलीप कुमारांना न्यूमोनिया.

Wednesday, October 10, 2018


मुंबई दि 
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्युमोनिया झाला असून रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती त्यांच्या चाहत्यांना देण्यात आली आहे. 

 ५ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, पण ते पूर्णपणे बरे झाले नव्हते. डिस्चार्जनंतर ९५ वर्षीय दिलीप कुमार यांना जेवण व औषधेही नळीवाटे दिली जात होती. रविवारी रात्री त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय फैसल फारूखी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 'रविवारी रात्री दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्यूमोनिया झाला असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ट्विटरद्वारे कळवण्यात येईल.' असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे..

No comments:

Post a Comment