बीडच्या विद्यार्थ्यांनी साधला व्हिएतनामच्या शिक्षकाशी संवाद

Monday, October 8, 2018

बीड: प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षकांना रोटरी क्‍लब ऑफ बीडच्या वतीने राष्ट्रशिल्पकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा शानदार सोहळा पार पडला. यावेळी जिल्हापरिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, प्राचार्य डॉ.सौ.दीपाताई क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून मायक्रोसॉफट सन्मानित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जिल्हापरिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांची उपस्थिती होती. शिक्षकांना मार्गदर्शन करतांना डिसले यांनी तंत्रस्नेही शिक्षणातील विचारप्रवाह याविषयी माहिती सांगितली. तसेच त्यांनीच तयार केलेल्या क्युआर कोड आणि व्हर्च्यअल माहिती देवून या पद्धतीने बीडमधील विद्यार्थ्यांचा व्हिएतनामच्या शिक्षकाशी संवाद घडवून आणला. यानंतर राष्ट्रशिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या गुणदानाधारे राष्ट्रशिल्पकार शिक्षकाची निवड ही आदर्श पद्धत आहे असे सांगत रोटरी क्‍लब ऑफ बीडच्या कार्याचा गौरव केला. यानंतर मा.दीपाताई क्षीरसागर यांनी शिक्षकांना येणार्‍या अडचणींवर मात करत एक आदर्श पिढी घडवण्याचे काम ते करत असतात, याबद्दल त्यांचा यथोचित गौरव होत आहे असे त्यांनी सांगितले.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे सहाय्यक प्रांतपाल रो. राहुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अध्यक्ष रो.अ‍ॅड.प्रशांत देशपांडे यांनी केले. सुत्रसंचलन रो.प्रा.सुनील जोशी, रो.डॉ.सचीन जेथलिया यांनी केले. प्रोजेक्ट चेअरमन रो.प्रा.सुनील खंडागळे, रो.कल्याण कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. शेवटी सचिव रो.डॉ.सुहास जोशी यांनी आभार मानले.

यांचा झाला गौरव
या राष्ट्रशिल्पकार पुरस्कार वितरण सोहळ्यात खडकी (लमानवस्ती) येथील शिक्षक चंद्रकांत मेंडके, राजपिंप्री येथील विशाल कुलकर्णी, बीड येथील सौ.दिप्ती देशमुख, धुनकवड येथील दिपक भिसे, साक्षाळपिंप्री येथील सौ.साधना आर्सुळ, वासनवाडी येथील सौ.भाग्यश्री जगताप, बीड येथील सौ.जयश्री बापट, महाजनवाडी येथील सौ.दिशा जाधव, उमरद येथील सौ.सुचिता गवते, जवळा येथील डी.जी.बागडेे, बीड येथील श्रीमती उज्वला कोठेकर, मिल्लीया कन्या शाळेतील शिक्षक मिर्झा खालेद बेग यांचा गौरव करण्यात आला. सौ.सुमन रामचंद्र जोशी यांना कर्तव्यपूर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment