लपून वार काय करता, समोरून वार करा. मी कोणालाच घाबरत नाही : ना पंकजाताई मुंडे

Thursday, October 18, 2018

सावरगाव (बीड) आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करत नाही. लपून वार काय करता, समोरून वार करा. मी कोणालाच घाबरत नाही ना मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मी तुमच्यामुळे मंत्री झालेय आणि महाराष्ट्रात २०१९ला भाजपाच्या विजयाचीच घंटा वाजणारच. मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे असे म्हणत ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. 

यावेळी पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या गडाचं नावही जाहीर केलं. "भगवानगड जसा भगवानबाबांची कर्मभूमी, तशी सावरगाव भगवानबाबांची जन्मभूमी आहे. म्हणजेच त्यांच्या भक्तीचा गड आहे. म्हणून या गडाचं नाव 'भगवानभक्ती गड'." अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.

जिथे नजर जाईल तिथपर्यंत जनसागर उसळला होता आणि ह्यापुढे असाच जनसागर उसळत राहणार सावरगावच्या "भगवान भक्तीगडा"वर ‘वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येईल’ असं म्हणत पंकजाताई मुंडे यांनी विरोधकांवर हल्ला केला आज संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्याला सुरूवात केली. या मेळाव्यात भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही झाले. या दसरा मेळाव्याला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती.



मी आणि आपले सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणार नाही. माझ्या कारखान्याच्या शेतकऱ्यांना FRP साठी पैसे नव्हते, तेव्हा माझ्या आईने स्वत:ची जमीन गहाण ठेवून पैसे दिले. तोडपाणी करण्याची कामं आम्ही करत नाही. सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं. असा टोला धनंजय मुंडेंना लगावत, त्या पुढे म्हणाल्या, "यांनी हौद तरी बांधला काय? फर्लांगभर रस्ता तरी बांधला का?

"उद्याचा दिवस मावळायच्या आत 'ऊसतोड कामगार महामंडळ' स्थापन करुन, त्याची घोषणा करणार आहोत. ऊसतोड कामगारांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करुन घेतला आहे.", अशी माहिती पंकजाताई मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून दिली. तसेच, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी मी संघर्ष करेन. प्रसंगी ऊसतोड कामगारांसाठी रानात कोयता घेऊन जाण्यासही तयार आहे, असेही पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

२०१४साली ९९ टँकर होते. पण, मी मंत्री झाल्यापासून चार वर्षात एकही टँकर लागला नाही. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी मी संघर्ष करत आहे.करत राहणार असे ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या 

सावरगाव येथे यंदा प्रथमच दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी अ.नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केल जात होतं. पण, या वर्षीपासून भगवान बाबांच्या गावात हा मेळावा होत आहे. या गावी आपण भक्ती घेऊन यायचं आणि शक्ती घेऊन जायचं, असे पंकजा यांनी म्हटले. तसेच अनेकांनी भगवान बाबाचं मंदिर बांधताना टीका केली. भगवान बाबांच मंदिर कशासाठी, स्मारक कशासाठी असेही काहीजण म्हणाले. पण, महाराष्ट्रात पोहोचलेल्या भगवान बाबांचं त्यांच्या गावात मंदिर का नको, असा प्रश्न पंकजा यांनी उपस्थित केला. तसेच हे मंदिर म्हणजे भगवान बाबांच्या भक्तांचं श्रद्धास्थान असल्याचेही पंकजा यांनी म्हटले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment